राज्यातील ११ वी प्रवेशासाठी चाचपणी!
कॅबिनेटच्या बैठकीत ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सकारात्मक चर्चा..
मुंबई, दि. 29 ऑक्टोबर:
राज्यातील अकरावी अॅडमिशन सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने ११ वीची अॅडमिशनही अजून झालेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यासंदर्भात महाधिवक्त्यांसोबत चर्चा करत आहेत.
मराठा आरक्षण प्रकरण कोर्टात असताना ११ वीची अॅडमिशन कशी करता येतील यावर चर्चा सुरु आहे.
हे प्रवेश कसे सुरु करता येतील, त्यासाठी काय काय कायदेशीर उपाय असतील? विद्यार्थ्यांचे हित कसे जपता येईल या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची महाधिवक्त्यांशी चर्चा सुरू आहे.
११ वीच्या प्रवेशांबाबत कॅबिनेटच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली असून सरकार सकारात्मक आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
