रुक्मिणी मातेचा देहुडा चरण अवतार !
पंढरपूर, दि. 29 ऑक्टोबर:
आज गुरूवार दिनांक २९/१०/२०२० रोजी निजअश्विन शु.१३, शारदीय नवरात्रौत्सव काल्यानिमीत्त श्री रूक्मिणी मातेस “श्री देहुडा चरण (श्री कृष्ण अवतार) ” पोषाख परिधान करण्यात आला आहे. श्री रूक्मिणी मातेस विविध पारंपारीक अलंकार परीधान करण्यात आले आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नित्योपचार पूजा होत असतातच पण सण, उत्सवाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मातेला विविध रुपात पूजा बांधली जाते.
शारदीय नवरात्रोत्सवातील काल्याच्या दिवशी श्री कृष्ण अवतार पूजा बांधण्यात आली. हे मनोहारी दृष्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे…
