माजी सैनिकांना राज्य सरकारची दिवाळी भेट!
मुंबई दि. 29 ऑक्टोबर:
राज्यातील सर्व माजी सैनिकांना व सैनिकांच्या विधवा पत्नींना दिवाळी आधी महाविकास आघाडी सरकारने भेट दिली आहे. राज्यातील सर्व माजी सैनिकांना या पुढे घरपट्टी व मालमत्ता कर भरावा लागणार नाही. राज्य सरकारने माजी सैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.
माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना घराच्या मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीला आज समंती देण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना लाभ होणार.
राज्यातील सुमारे अडीच लाख माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींना या निर्णयामुळे मालमत्ता करातून सूट मिळणार आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका यांनी स्वच्छेने माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नींच्या मालमत्ता कराचा भार स्वत: स्विकारावा व ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांच्यावरील आर्थिक भाराची प्रतिपूर्ती ग्रामविकास व नगरविकास विभागामार्फत करण्यात येणार.
