MPCC मीडियाचे श्रीनिवास बिक्कड यांचा सन्मान!

0
20201027_131608

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मीडिया विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
मीडिया समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांचा ‘प्रभासाक्षी’ कडून सन्मान.
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मीडिया विभागाच्या शिरपेचात मानाच्या तुरा रोवला गेला आहे. सर्वात जास्त वेगाने वस्तुनिष्ठ व अचूक बातम्या देण्यात काँग्रेसच्या मीडिया विभागाने बाजी मारली आहे. भारतातील प्रमुख वेब पोर्टल प्रभा साक्षीने याची दखल घेऊन सर्वश्रेष्ठ राजकीय मीडिया विभागाचा पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे.
प्रभासाक्षी हे भारतातील प्रमुख हिंदी वेब पोर्टल असून मागील वर्षांपासून त्यांनी या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या मीडिया विभागातून वेगवान, जास्तीत जास्त व अचुक बातम्या देणाऱ्या विभागाला हे पुरस्कार देण्यात येतात. या श्रेणीत यंदाच्या वर्षी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला हा मान मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
प्रभासाक्षीच्या १९ व्या वर्धापन दिनी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि हा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *