कोरोनावर अखेर औषध आले ; एका गोळीची किंमत १०३ रुपये !
कोरोनावर अखेर औषध आले ; एका गोळीची किंमत १०३ रुपये !
मुंबई, दि. २० जून २०२०
सर्व जग ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करत होते ती आता संपली असून कोरोनावरचे औषध आता बाजारात येत आहे. ग्लेनमार्क या कंपनीने कोरोनावरचे औषध बनवले असून त्याचे नाव fabiflu आहे. या औषधाचे उत्पादन व विक्रीस ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कडून (DCGI) परवानगी मिळाल्याचे कंपनीने सांगितले आहे. कोरोनाची सौम्य व प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांना हे औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळेल.
पहिल्या दिवशी १८०० mg च्या दोन गोळ्या तर त्यानंतर १४ दिवस ८०० mg च्या दोन गोळ्या दररोज असा डोस घ्यावा लागणार आहे. मधुमेह अथवा ह्रदयरोग असणाऱ्या रुग्णांनाही या गोळ्या देण्यास हरकत नाही असे कंपनीने म्हटले असून याच्या एका गोळीची किंमत ही १०३ रुपये असणार आहे.
देशात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत असताना या औषधाचा शोध लागला असून त्याचा फायदा कोविड-१९ वर मात करण्यास नक्कीच होईल अशा आशा कंपनीने व्यक्त केली आहे. हे औषध बाजारात आणण्याआधी त्याचा टेस्ट घेण्यात आल्या असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून आल्याचा कंपनीचा दावा आहे. सरकार व मेडीकल क्षेत्रातील लोकांच्या सहकार्याने या गोळ्या सहज सर्वत्र उपलब्ध होतील याची व्यवस्था केली जाईल असेही कंपनीने म्हटले आहे.
