20201025_220033

 

मुंबई, दि. २५ ऑक्टोबर:
दसरा मेळव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण करत विरोधकांची पिसं काढली. मागच्याच आठवड्यात बोलल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आज खरेच मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून समाचार सगळे हिशोब चुकते केले. राज्यातील मंदीरं का उघडत नाही यावरून सर्व मर्यादा सोडून पत्र पाठवणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय…ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे.

सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं. त्यांना मानणाऱ्यांनी त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर का डोकं असेल तर त्या डोक्याला म्हणावं विचार करा, हे हिंदुत्व तुम्हाला पटतं का?
देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नाही, बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व आहे. शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व यात जमीन आसमानाचे अंतर आहे. इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता असेच तुमचे धोरण आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मला सेक्युलर झाला आहात का असे विचारणाऱ्यांनी हे सांगावे की, पंतप्रधानपदाचा सेक्युलर चेहरा असावा असे म्हणत एनडीएमधून बाहेर पडलेल्या संयुक्त जनता दलाच्या नितीशकुमार यांच्याशी भाजपाने नंतर हातमिळवणी केली त्यावेळी नितिशकुमारांनी तुम्हाला सेक्युलरचे इंजेक्शन दिले का, याचे उत्तर द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *