Ads

--

पंढरपूरच्या विठोबाला झेंडूची आरास!

By Xtralarge News

October 25, 2020 3:51 pm

Ads

पंढरपूर, दि. 25 ऑक्टोबर:

दस-यानिमित्ताने आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीमातेस झेंडू आणि कामिनी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.

पुण्यातील रामभाऊ जांभूळकर या भाविकाने हि सेवा अर्पण केली आहे. नवरात्रात रुक्मिणी मातेस साज शृंगाराने विविध रूपे साकारली आहेत.

साडे तीन मुहूर्ता पैकी एक म्हणजेच दसरा. नवरात्रात ९ दिवस येथील रुक्मिणीमातेला विविध अलंकार,भरजरी साडी,विविध रूप अशा साज शृंगाराने सजवले होते.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती वर्षभरातील विविध सण,उत्सव आदी महत्वाच्या दिवसाचे औचित्य साधून फुलांची आरास केली जात असते.

No comments to show.

Leave a Comment