Ads

--

आजच्या दसरा मेळाव्याचा ‘रावण’ कोण?

By Xtralarge News

October 25, 2020 12:22 pm

Ads

मुंबई, दि. 25 ऑक्टोबर:
शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक नातं आहे. दरवर्षी
शिवाजी पार्कवर होणारा हा मेळावा शिवसैनिकांसाठी विचाराची पर्वणीच असतो.यावर्षी कोरोनामुळे हा मेळावा होणार का नाही याबाबत साशंकता होती पण दसरा मेळावा तर होणारच आहे. फक्त तो शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे.

ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असताना ते काय बोलणार, कोणाचे हिशोब चुकते करणार आणि पुढची दिशा काय असेल याची उत्सुकता आहे. मागील आठवड्यातच उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाची मुखपट्टी काढून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. आज संध्याकाळी ते कोणाला डोस देणार हे ऐकणं रंजक ठरणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील  राजकीय गणिते बदलली असून भाजपाला दे धक्का करत शिवसेनेने सीमोलंघन करत चक्क काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यात भाजपाची पिसं उद्धव ठाकरे काढणार यात शंकाच नाही.
आजच्या दसरा मेळाव्याबाबात खा. संजय राऊत म्हणाले  की, ‘दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयारी केली आहे. ते काय बोलतील हे संध्याकाळी समजेलचं. कोरोना नसता तर आजच्या मेळाव्यासाठी शिवतीर्थ अपुरं पडलं असतं. २०१९ चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्त्वाचा होता. त्याचवेळी मी म्हणालो होतो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार त्यामुळं आजच्या दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनाचा पहिलाच दसरा आहे.

No comments to show.

Leave a Comment