Ads

-

आम्ही येथे कशासाठी आहोत?

By Xtralarge News

October 22, 2020 2:46 pm

Ads

मुंबई, दि. २२ ऑक्टोबर:

मुंबई हाय कोर्टाने अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला चांगलेच झापले आहे. सर्व तुम्हीच करणार असाल तर आम्ही येथे कशाला बसलो आहोत, असा सवाल कोर्टाने केला आहे.

कोर्टाने म्हटले आहे की,’एखाद्याच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना ती हत्या आहे, असे म्हणणे किंवा एखाद्या संशयित व्यक्तीला अटक करण्याचे हॅशटॅग चालवून लोकांची मते घेण्याचा कार्यक्रम चालवणे, ही शोध पत्रकारिता आहे का? तुम्ही शवविच्छेदन अहवालाच्या आधारे बातम्या प्रसारित करण्यापूर्वी त्या पूर्ण अहवालाची, मृत्यूच्या कारणांविषयीच्या अहवालाची खातरजमा केली होती का?

तुम्हीच तपास यंत्रणा, सरकारी पक्ष व न्यायालयाचेही काम करत असाल तर आम्ही इथे कशासाठी आहोत? न्यायव्यवस्था कशासाठी आहे? असा संतप्त सवाल कोर्टाने विचारला.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मीडियाला दूर ठेवावे अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिका मुंबई हाय कोर्टात दाखल झाल्या आहेत. तर काही टीव्ही चॅनेल मीडिया ट्रायल चालवत असून त्यांनाही रोखले जावे अशी मागणी करणाऱ्या याचिका आल्या आहेत त्यावर सुनावणी सुरु होती.

 

No comments to show.

Leave a Comment