Ads

--

बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा!

By Xtralarge News

October 21, 2020 12:13 pm

Ads

मुंबई, दि. 21  मुंबई:

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर तोफ डागली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची फक्त पाहणी केली जात आहे. पण मदत जाहीर केली जात नाही.

फडणवीस म्हणाले,’ महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यांचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.

शेती वाया गेली आहे, पिकं वाया गेली आहेत. लोक इतके अडचणीत आहेत, पण पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस  दोन दिवसापासून नुकसानीची  पाहणी करत आहेत. काल उस्मानाबाद तर आज ते हिंगोली दौऱ्यावर आहेत. या दौ-यात त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला.

No comments to show.

Leave a Comment