Ads

--

तुळजाभवानीची रथालंकार पूजा!

By Xtralarge News

October 20, 2020 2:42 pm

Ads

तुळजापूर, दि. २० ऑक्टोबर:

शारदीय नवरात्रोत्सवातील चौथ्या माळेनिमित्त मंगळवारी तुळजाभवानीला रथालंकार पूजा मांडण्यात आली.
पहाटे तुळजाभवानीचे चरण तीर्थ झाले. त्यानंतर पंचामृत अभिषेक घाट होऊन दुग्धाभिषेक व पंचामृत अभिषेक घालण्यात आला. नैवैद्य, धुपारती, अंगारा आदी दैनंदीन विधी करुन झाल्यानंतर तुळजाभवानीला विशेष रथालंकार महापूजा मांडण्यात आली.
तुळजाभवनी सप्तअश्व असलेल्या रथात आरुढ होऊन महिषासुराशी युद्धाला सामोरे जाते. तुळजा भवानीच्या एका हातात चाबक, दुसऱ्या हातात घोड्यांचा लगाम, मस्तकी मळवटात माईली गंध, केशरुपी अवतारात रौद्र रुपात तुळजाभवानी आसुरावर चालून गेलेली पूजा मांडण्यात आली आहे.

तुळजाभवानीस स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकीच्या भ्रमणासाठी साक्षात सूर्यनारायणाने आपला अश्वरथ दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.

No comments to show.

Leave a Comment