वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस नाईक विद्या कोळेकर.

0
20201019_224059

पतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना मैदान तयार करुन देण्यासाठी दिले भरीव योगदान.

सोलापूर , दि. 19 ऑक्टोबर  :

नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पोलीस नाईक विद्या कोळेकर…
 
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस नाईक विद्या कोळेकर यांनी त्यांच्या पतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना मैदान तयार करुन देण्यासाठी भरीव योगदान दिले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी कोळेकर यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे. असे गौरवोद्‌गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *