Ads

--

‘लोकल’वरून केंद्र सरकार राजकारण करत आहे?

By Xtralarge News

October 19, 2020 8:50 pm

Ads

मुंबई, दि. 19 ऑक्टोबर:

मुंबईतील लोकल सेवेबाबत केंद्र सरकार राजकारण करत आहे.महिलांसाठी लोकल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असताना ती का सूरू केली जात नाही. आधी रेल्वे मंत्री पियुष गोयल हे राज्य सरकारला जबाबदार धरत होते पण आता काय झाले गोयल गप्प का आहेत असा प्रश्न मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे.
मंत्री नवाब मलिक म्हणाले, अनलाॅक करताना राज्य सरकारने अनेक सेवांना हिरवा कंदील दाखवला आहे. मोनो, मेट्रो सुरू झाली आहे. आता लवकरच लोकलसेवा नियमित करण्यासही राज्य सरकार परवानगी देईल अशी आशा निर्माण झाली आहे.
मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर नियमित रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी’, अशी मागणीच त्यांनी केली. राज्य सरकारने सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यांतरही रेल्वेने तशी परवानगी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे  आरोपही मलिक यांनी केला आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल हे लोकल सेवा सुरू करण्यास आम्ही तयार आहोत पण राज्य सरकार परवानगी देत नाही, असे सांगतात आणि दुसरीकडे राज्य सरकारने परवानगी देऊनही महिलांसाठी लोकलची दारे खुली केली जात नाहीत, याचा अर्थ काय घ्यावा? असा प्रश्न  मलिक यांनी विचारला आहे.
नियमित लोकल सेवा सुरू करा, जादा लोकल सोडा. गरज असल्यास महिला विशेष लोकल सोडा, अशा मागण्याही नवाब मलिक यांनी केल्या आहेत.

No comments to show.

Leave a Comment