Ads

--

बोरखेडा हत्याकांड खटला फास्टट्रॅक कोर्टात!

By Xtralarge News

October 17, 2020 10:03 pm

Ads

जळगाव, दि.१७ ऑक्टोबर:

बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पीडितांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यासाठी अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

बोरखेडा, ता.रावेर येथे चार बालकांची निघृण हत्या झाली त्या ठिकाणास गृहमंत्री श्री.देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

गृहमंत्री म्हणाले, या हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहेत. काही संशियतांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पीडितांना योग्य ती मदत देण्यात येईल तसेच त्यांना रेशनकार्ड, जातीचा दाखला, घरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

No comments to show.

Leave a Comment