…तर तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही!
मुंबई, दि.14 ऑक्टोबर:
राज्यातील मंदिरं उघडण्याविषयी राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा वाद ताजा असतानाच या वादात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून वादाला आणखीनच खतपाणी घातले आहे.
अमृता फडणवीस म्हणतात, “वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते”
अमृता यांच्या टीकेनंतर शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे. आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशारा दिला आहे.
