Ads

-

RSS ची नोंदणी करा व निधीचा स्रोत सांगा!

By Xtralarge News

June 16, 2026 1:04 pm

Ads

RSS ची नोंदणी करा व निधीचा स्रोत सांगा!

बंगलुरु, दि. १६ जून २६.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) त्यांच्या निधीचा स्रोत, नोंदणी आणि कायदेशीर दर्जा यांबाबतची माहिती जाहीर करावी, असे आवाहन कर्नाटकचे गृहमंत्रीपद प्रियांक खर्गेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख डॉ. मोहन भागवत यांना केले आहे.

गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी मोहन भागवत यांना पाठवलेल्या पत्रात कर्नाटकातील कार्यक्रमांचा उल्लेख केला आहे. त्यांनी हे पत्र ‘एक्स’ (X) वर शेअर केले असून, आरएसएसकडून लवकरच प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. नागरिक, कामगार, स्वयंसेवी संस्था (NGOs), ट्रस्ट, मंदिरे आणि कंपन्यांकडून नोंदणी करणे, माहिती देणे आणि कायद्याचे पालन करणे अपेक्षित असताना, आरएसएसला त्यातून सूट का दिली जावी, असा प्रश्न प्रियांक खर्गे यांनी उपस्थित केला.

आरएसएसच्या नोंदणीचा वाद पुन्हा उफाळून आला असून संघाला १०० वर्षे झाली तरी अद्याप त्याची नोंदणी का केली जात नाही असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. तर संघाला नोंदणी करण्याची आवश्यकता नाही संघाकडून सांगण्यात येते. खर्गे यांच्या पत्राने पुन्हा एकदा आरएसएसच्या नोंदणी व देणगीची चर्चा सुरु झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment