Ads

-

आ. रोहित पवारांचे आंदोलन स्थगित..

By Xtralarge News

June 15, 2026 4:40 pm

Ads

आ. रोहित पवारांचे आंदोलन स्थगित..

पंढरपूर, दि. १५ जून २६.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुरु केलेले आंदोलन स्थगित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले.

आमदार रोहित पवार यावर म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क साधून चर्चा केली आणि येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच २२ जूनपूर्वी मुंबईत बैठक घेऊन कर्जमाफीतील या जाचक अटीशर्ती काढून टाकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिले आहे. त्यामुळं गेले तीन दिवस सुरु असलेलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या नामदेव पायरीवर माझ्यासोबतचे सर्व उपोषणकर्ते, वारकरी, शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत महाआरती करुन उपोषणाची औपचारीक सांगता करण्यात आली.

सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सुरवातीला अटीशर्ती नाकारणारं सरकार आता या अटीशर्ती काढण्याबाबत तयार झालं, हे या आंदोलनाचं यश आहे असेही रोहित पवार म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment