Ads

--

NEET पेपर लिक प्रकरणी काँग्रेस आक्रमक..

By Xtralarge News

June 15, 2026 3:55 pm

Ads

NEET पेपर लिक प्रकरणी काँग्रेस आक्रमक..

नवी दिल्ली, दि. १५ जून २६.

नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नरेंद्र मोदी सरकार विरुद्ध काँग्रेसने देशव्यापी लढा पुकारला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करत असून, हे आंदोलन १७ जून २०२६ रोजी राजस्थानमधील कोटा शहरातून सुरू होणार आहे.

कोटा हे केवळ राजस्थानमधील एक शहर नाही, तर ती देशाची ‘कोचिंग कॅपिटल’ आहे. कोटामध्ये  उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा आणि झारखंडसह देशाच्या कानाकोपऱ्यातून २ ते ३ लाख विद्यार्थी NEET आणि JEE सारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी येथे राहतात. NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा सर्वात मोठा फटका याच विद्यार्थ्यांना बसला आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेस पक्ष व NSUI या विद्यार्थी संघटनेने देशभर आंदोलन छेडलेले आहे. राहुल गांधी यांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेत मोदी सरकारला घेरले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेसची मुख्य मागणी आहे. मोदी सरकारच्या काळात तब्बल ७० पेक्षा जास्त वेळा पेपर फुटीची प्रकरणे झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

No comments to show.

Leave a Comment