बंडखोरांनो, आधी राजीनामा द्या मग कुठेही जा..
कोलकाता, दि. १३ जून २६..
तृणमुल काँग्रेसमधील बंडखोरीचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. आता पक्षातच दोन तीन गट पडले आहेत. खासदार महुआ मोईत्रा यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे. संविधानात संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे बंडखोर खासदारांनी आधी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असा इशारा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी दिला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी बंडखोर खासदारांवर कडक शब्दांत टीका करत म्हटले की, हे खासदार संविधानाचा चुकीचा अर्थ लावत आहेत आणि संसदेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर आधार नाही. TMC च्या त्या गद्दार खासदारांना कायद्याचे ज्ञान नाही. संविधानातील ९१ व्या घटनादुरुस्तीने पक्षात फूट पडणे किंवा फुटीर गट स्थापन करणे यासंबंधीची तरतूद रद्द केली आहे.यात खासदारांच्या संख्येला महत्त्व नाही; तर मूळ राजकीय पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणे आवश्यक असते. त्या सर्व १९ गद्दारांनी राजीनामा द्यावा आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी..
लोकसभेत स्वतंत्र आसनव्यवस्था मिळवण्याच्या १९ बंडखोर खासदारांच्या निर्णयामुळे टीएमसीमधील (TMC) अंतर्गत राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे या हालचालीमुळे पक्षात फूट पडण्याची आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी (NDA) संभाव्य युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रितुब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील एका बंडखोर गटाने १९ लोकसभा खासदार आणि ६४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. १८ मे रोजी या गटाने १९ खासदारांची नावे लोकसभा अध्यक्षांकडे सादर केली आणि संसदेत स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.
Leave a Comment