ममता बॅनर्जींच्या TMC चे खासदारही फुटले..
कोलकाता, दि. ८ जून २०२०६.
विधानसभेतील पराभवानंतर ममता बॅनर्जींना दुसरा मोठा धक्का बसत आहे. पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षाच्या विभाजनानंतर, आता टीएमसीच्या (TMC) संसदीय पक्षातही फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. या पत्रात खासदारांनी एनडीए (NDA) मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या पत्रावर अरुप चक्रवर्ती, पार्थ भौमिक, सताब्दी रॉय, जगदीश वसुनिया, काकोली घोष दस्तीदार, प्रसून बॅनर्जी, कालीपदा सोरेन, शर्मिला सरकार, जून मालिया, वापी हलदार, असित मल आणि सुवेंदु शे अशा 20 खासदारांनी स्वाक्षरी केली आहे. काकोळी घोष दस्तीदार यांना असंतुष्ट गटाचे नेते म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ममता बॅनर्जी यांचा व त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षांत उभी पडली आहे. विधिमंडळ पक्षात फूट पडली आता संसदीय पक्षातही फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या भाचे अभिजित बॅनर्जी यांचे नेतृतव् नको म्हणत या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. ममता बॅनर्जी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला आल्या असता ४-५ खासदारांनीच त्यांची भेट घेतल्याचे समजते.
Leave a Comment