Ads

--

अर्थखाते NCP ला परत द्या

By Xtralarge News

June 8, 2026 4:02 pm

Ads

अर्थखाते NCP ला परत द्या

मुंबई, दि. ८ जून २०२६.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्थ खाते परत देण्याची विनंती केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी अर्थ खाते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे.

२८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यापासून अर्थ खाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होत असून, त्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखात्यासारखे महत्त्वाचे खाते सोपवले जावे, असा प्रयत्न आहे.३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांसारख्या नेत्यांनी सहभाग घेतला. बैठकीदरम्यान, महायुती सरकारमधील अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे होते, यावर एकमताने सहमती झाली.

 

No comments to show.

Leave a Comment