NEET नंतर आता CBSE परिक्षेत घोटाळा.
नवी दिल्ली, दि. २८ मे २००६.
NEET पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता CBSE परीक्षेचे निकालावरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) प्रणालीत मोठ्या प्रामणात तांत्रिक चुका झाल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती त्यांच्या मूळ हस्ताक्षराशी जुळत नाहीत. OSM प्रणालीद्वारे डिजिटल पद्धतीने तपासलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये गुणांची मोठी तफावत आढळली आहे.
सीबीएसईतील घोटाळ्यावर राहुल गांधी यांनी तोफ डागली असून ते म्हणतात की, देशभरातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना धक्का बसलेल्या आहे. आणि पंतप्रधान मोदीजी नेहमीप्रमाणेच काहीही उत्तर देत नाहीत, जबाबदारी नाही आणि त्यांना लाजही नाही. या परिक्षेसाठी नेमलेल्या कंपनीने—COEMPT—यापूर्वी २०१९ मध्ये तेलंगणामध्ये ‘ग्लोबारेना’ या नावाने काम करताना हेच गैरप्रकार केले होते. नाव बदलले आहे—पण हेतू तोच आहे; स्वरूप बदललेले नाही. सर्वांना माहिती होती, तरीही त्याच कंपनीला कंत्राट देण्यात आले. १८.५ लाख मुलांचे भविष्य अशा कंपनीच्या हाती सोपवण्यात आले आणि कोणालाही त्याची पर्वा नव्हती.
ही चूक नाही तर हा एक सुनियोजित कट असून या घोटाळ्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत: COEMPT ला हे कंत्राट का देण्यात आले आणि कोणाच्या सांगण्यावरून? या कंपनीला हे कंत्राट देण्यासाठी कोणते नियम आणि कार्यपद्धती डावलण्यात आल्या? COEMPT यापूर्वी ‘ग्लोबारेना’ या नावाने वादात सापडली होती; CBSE ला याची माहिती का नव्हती? पार्श्वभूमी तपासणी का करण्यात आली नाही? आणि COEMPT चे व्यवस्थापन आणि मोदी सरकार यांच्यात नेमके काय संबंध आहेत? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित करून या संपूर्ण घोटाळ्यामागील खऱ्या गुन्हेगारांना उघडकीस आणण्यासाठी तात्काळ स्वतंत्र न्यायालयीन चौकशी आणि विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे.
Leave a Comment