अमर, अकबर, अँथनीच ‘रॉर्बट शेठ’ला हरवणार!

0
20201008_114014

मुंबई, दि. 8 ऑक्टोबर :

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारला अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असल्याचे म्हणत या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असे म्हणणा-या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वर  काँग्रेस व राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.

अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” असे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, ‘ रावसाहेब दानवे म्हणाले महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे, ते बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि करोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण, होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी’.

राज्यातील तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे नेते वारंवार म्हणत असतात की, हे सरकार आम्ही पाडणार नाही ते आपसातील भांडणातून पडेल. कधी या सरकारला ते तीन चाकी रिक्षा असे ही म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *