Ads

--

TVK मजबूत तर AIADMK ला फुटीचे ग्रहण.

By Xtralarge News

May 27, 2026 2:47 pm

Ads

TVK मजबूत तर AIADMK ला फुटीचे ग्रहण.

चेन्नई, दि. २७ मे २०२६..

तामिळनाडूत आता चार नाही तर २६ जागांवर पोटनिवडणुका होऊ शकतात. स्व. जयललिता यांचा AIADMK पक्ष उभी फुट पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, विरोधी पक्षाच्या विकेट्स पडत आहेत. AIADMK पक्षाच्या आणखी एका बंडखोर आमदाराने राजीनामा दिला असून आतापर्यंत AIADMK च्या चार आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत.विश्वासदर्शक ठरावादरम्यान, AIADMK चे २५ आमदार बंडखोर बनले होते, त्यातील चौघांनी नंतर राजीनामा दिला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत AIADMK ने ४७ जागांवर विजय मिळवला होता पण विश्वासदर्शक ठरावादरम्यान यातील २५ आमदारांनी विजय थलपती यांना पाठिंबा दिला. जर AIADMK ने बंडखोर आमदारांवर दबाव आणला तर ते सर्वजण राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अण्णा द्रमुक पक्षातील स्थिती अशीच राहिली तर तामिळनाडू मध्ये AIADMK पक्षाचे अस्तित्वच पूर्णपणे संपुष्टात येईल की काय अशी परिस्थिती दिसत आहे.तर दुसरीकडे जोसफे विजय यांचा टीव्हीके पक्ष मात्र मजबूत होत आहे. दक्षिण भारतातील ही राजकीय उलाथापालथ नवे राजकीय समिकरण बनवत आहे.

No comments to show.

Leave a Comment