देवेंद्र फडणवीसच ‘रिजेक्टेड माल’!
मुंबई, दि. २३ मे २०२६..
देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांना “रिजेक्टेड माल” म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संसदीय लोकशाही संदर्भात आपली बौद्धिक दिवाळखोरी दर्शवत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेत पुढे म्हणाले की, देशातील जनता सरकार निवडून देते, त्याचप्रमाणे विरोधी पक्षालाही निवडून देते. अन्यथा संसद अथवा विधिमंडळाची गरजच नसती; सरकार अध्यादेशावर चालले असते.
विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा जगाला आदर्श देणाऱ्या भारतात द्वेषाचे आणि तिरस्काराचे विष पसरवणारे भाजपा व संघाचे नेतेच विषारी आणि सडका माल आहेत, हे जनतेने लक्षात ठेवावे. एक नासका आंबा सर्व आंबे नासवतो; इथे तर सडक्या आंब्यांचीच रास आहे. संत परंपरेतून पुरोगामी विचारांचे संस्कार झालेल्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सामाजिक सद्भावनेचे वातावरण हीच मंडळी नासवू पाहत आहेत.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या होत्या. भाजपाला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. मग महाराष्ट्रासाठी रिजेक्टेड माल कोण होता बरं? असा टोलाही सावंत यांनी लगावला..
Leave a Comment