Ads

--

CM, खोटं बोलू नका, पेट्रोल डिझेल द्या !

By Xtralarge News

May 23, 2026 10:40 pm

Ads

CM, खोटं बोलू नका, पेट्रोल डिझेल द्या !

चंद्रपूर, दि. २३ मे २६;

मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले आहे असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ऐन हंगामात मशागतीची कामं झाली नाहीत, तर पेरण्या वेळेवर होणार नाहीत. पेरण्या लांबल्या तर थेट उत्पादनावर परिणाम होईल. याचा अंतिम फटका संपूर्ण राज्याला आणि देशाला बसेल, बाजारात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण होईल आणि महागाई गगनाला भिडेल.

आज शेतकरी डिझेलसाठी वणवण भटकतोय, उद्या सामान्य जनतेला अन्नधान्यासाठी वणवण भटकावे लागेल. सत्तेच्या धुंदीत राहून वस्तुस्थिती नाकारणं बंद करा. शेतकऱ्यांचे हाल थांबवा आणि तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करा.अन्यथा, टंचाईमुळे उद्भवणाऱ्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असेही वडेट्टीवार म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment