Ads

--

‘सनातन’च्या विधानावरून उदयनिधी स्टालीनला उपरती.

By Xtralarge News

May 15, 2026 2:47 pm

Ads

‘सनातन’च्या विधानावरून उदयनिधी स्टालीनला उपरती..

चेन्नई, दि. १५ मे २०२६.

तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि द्रमुकचे (DMK) नेते उदयनिधी स्टालिन यांनी, सनातन धर्माबाबतच्या केलेल्या विधानांची धार सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच्या विधानावर सारवासारव करत ‘सनातनच्या उच्चाटनाची’ मागणी करण्याचा अर्थ लोकांनी मंदिरांना भेट देणे थांबवावे, असा होत नाही, असा खुलासा उदयनिधी स्टालिन यांनी केला आहे.

उधयनिधी स्टालिन यांचे हे विधान भाजप नेते आणि के. अन्नामलाई यांनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. “सनातनच्या संपूर्ण उच्चाटनाचा” आपला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, उधयनिधी यांनी सर्वप्रथम “स्वतःच्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखून दाखवावे, असे आव्हान अन्नामलाई यांनी दिले होते. उदयनिधी स्टालिन यांच्या विधानावर त्यांच्या आईकडून आव्हान मिळाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या कार्यकाळाची सुरुवातच उदननिधीच्या सनातनवरील वादग्रस्त विधानाने झाली. विधानसभेतील पहिल्याच दिवशी, ‘सनातनच्या संपूर्ण उच्चाटना’च्या विधानाची झळ सत्ताधारी पक्ष ‘टीव्हीके’लाही बसली. टीव्हीके (TVK) पक्षाच्या आमदारांनी मात्र आता या मुद्द्यावर पुन्हा एकदा वादग्रस्त सूर आळवण्यास सुरुवात केली आहे.

No comments to show.

Leave a Comment