दिल्लीत ‘स्लीपर बस’मध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार.
नवी दिल्ली, दि. १४ मे २०२६..
राजधानी दिल्लीमध्ये ‘निर्भया’ सारखे प्रकरण झाले असून या बलात्कार प्रकरणाने राजधानी हादरली आहे. १४ वर्षापूर्वी एका मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराने अख्खा देश हादरला होते. अण्णा हजारे यांच्या उपोषणाने महिला आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि पुढे या बलात्कारकांड मुळेच डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकारही गेले. आता पुन्हा राजधानी दिल्लीत निर्भया कांड झाले आहे.
राणी बाग परिसरात, एका उभ्या असलेल्या ‘स्लीपर बस’मध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी बसचा चालक आणि वाहक यांना अटक केली असून बसही जप्त केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिस आणि तक्रारीनुसार, ११ मे च्या रात्री कामावरून घरी परतत असताना पीडित महिला ‘सरस्वती विहार’ बस थांब्याच्या परिसरात पोहोचली होती. त्याचवेळी, तिथे उभ्या असलेल्या एका ‘स्लीपर बस’मधील एका व्यक्तीकडे तिने वेळ विचारली असता, तिला बळजबरीने बसच्या आत ओढण्यात आले. त्यानंतर ती बस ‘नांगलोई’च्या दिशेने नेली, जिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित महिला ‘पितमपुरा’ येथील एका झोपडपट्टीत राहते आणि ‘मंगोलपुरी’ येथील एका कारखान्यात काम करते. ती विवाहित असून तीन मुलांची आई आहे. महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Leave a Comment