Ads

--

मंत्र्यांना एक गाडी आणि एक अंगरक्षक ठेवा..

By Xtralarge News

May 13, 2026 11:21 am

Ads

मंत्र्यांना एक गाडी आणि एक अंगरक्षक ठेवा..

मुंबई, दि. १३ मे २६ :-

प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केली आहे.

 

आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशावर भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले होते. यावर आता विविध मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंतराव पाटील यांनीही या आवाहनावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

जयंतराव पाटील म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या… वाजवल्या. दिवे लावायला सांगितले तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण २०-३० गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात. प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच… पण सत्ताधाऱ्यांनीही “राष्ट्र प्रथम” हे धोरण कृतीत उतरवावे असेही ते म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment