तामिळनाडूच्या AIADMK पक्षात उभी फूट.
चेन्नई, दि. १२ मे २०२६..
तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठी राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे.’एआयएडीएमके’ (AIADMK) पक्षात उभी फूट पडली आहे. AIADMK चे वरिष्ठ नेते एस. पी. वेलुमणी आणि सी. व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगम (TVK) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यासोबतच आणखी ३० आमदारांनीही विजय यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
पक्ष सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी (EPS) हे द्रमुक (DMK) ला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याच्या विचारात होते, या निर्णयाला विरोध करत षण्मुगम गटाने वेगळी भूमिका घेतली आहे. षण्मुगम यांनी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, आम्ही ‘टीव्हीके’ सरकारला आमचा पाठिंबा जाहीर करतो. जर आम्ही ‘डीएमके’शी (DMK) युती केली असती, तर ‘एआयएडीएमके’चे (AIADMK) अस्तित्वच संपुष्टात आले असते.”
विधानसभा निवडणुकीत AIADMK ला केवळ ४७ जागा जिंकता आल्या.AIADMK मध्ये आता केवळ पलानीस्वामी गटच उरला आहे, ज्यामध्ये १७ नेत्यांचा समावेश आहे. १७ व्या तामिळनाडू विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी, AIADMK चे नवनिर्वाचित सदस्य सोमवारी दाखल झाले, तेव्हा या दोन गटांमधील मतभेद सर्वप्रथम समोर आले.
Leave a Comment