Ads

-

TCS प्रकरणातील फरार निदा खानला अटक.

By Xtralarge News

May 8, 2026 1:24 pm

Ads

TCS प्रकरणातील फरार निदा खानला अटक.

नाशिक, दि. ८ मे २०२६..

नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने निदा खानला अटक केली आहे. हे प्रकरण उघड झाल्यापासून निदा खान फरार होती, अटकपूर्व जामीनासाठी तीने प्रयत्न केला पण न्यायालयाने तीची याचिका फेटाळली होती तरिही ती फरारच होती.

निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधील कौसर पार्क परिसरात नाव बदलून गुप्तपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, पोलिसांनी सापळा रचून रात्री तिला ताब्यात घेतले व नाशिकमध्ये आणून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तिचा सहभाग आहे. नाशिक पोलिसांचे ‘विशेष तपास पथक’ (SIT) सध्या एका आयटी कंपनीच्या नाशिक येथील शाखेत घडलेल्या विनयभंग आणि छळाच्या नऊ प्रकरणांचा तपास करत आहे.

निदा खानचा सोशल मीडियावरील फोटो आणि प्रत्यभातील फोटा यात मोठी फरत आहे. आपल्याला कोणीही ओळखू नये म्हणून निदा खानने जाणीवपूर्वक सोशल मीडियावर वेगळा फोटा पोस्ट केला होता.

No comments to show.

Leave a Comment