८० हजार फेक अकाऊंटवर राम कदम गप्प का?
मुंबई दि. ७ ऑक्टोबर:
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने फेसबुक आणि ट्वीटरवरील ८० हजार फेक अकाऊंट उघड केल्यानंतर महाविकास आघाडीला सतत बदनाम करणारे भाजपचे प्रवक्ते राम कदम आता गप्प का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
सुशांतसिंग रजपूत मृत्यूप्रकरणी ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे असे वारंवार राम कदम मिडियावर सांगत होते. शिवाय भाजपाचे अनेक बडे नेते मुंबई पोलिसांवर व त्यांच्या तपासावर अविश्वास दाखवत होते.
सुशांत सिंगच्या मृत्यूमागे महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मंत्री व नेते आहेत म्हणून मुंबई पोलिस कुणाचातरी बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला होता याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली आहे. एम्सने सुशांत सिंगची आत्महत्याच होती हे जाहीर केल्यानंतर भाजपच्या आरोपाची हवाच निघून गेली आहे. त्यातच मुंबई पोलिसांनी नुकतीच फेसबुक आणि ट्वीटरवर ८० हजार फेक अकाऊंट उघडकीस आणली आहे. यामागे भाजपाचे षडयंत्र होते हे आता उघड झाले आहे.
सुशांत सिंगची हत्या झाल्याचे बोलणारे नेते ८० हजार फेक अकाऊंटवर आता तोंडावर पट्टी बांधून का? की अजून ते त्याच वक्तव्यावर ठाम आहेत हे स्पष्ट करावे असे आव्हान महेश तपासे यांनी दिले आहे.
