Ads

--

तामिळनाडूत विजय थलपतीचा धमाकेदार विजय..

By Xtralarge News

May 4, 2026 6:29 pm

Ads

तामिळनाडूत विजय थलपतीचा धमाकेदार विजय..

मुंबई, दि. ४ मे २०२६..
पाच राज्यातील विधानसभेच्या निकालात सर्वात मोठा व आश्चर्यकारक विजय हा तामिळनाडूचा आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अभिनेता विजयच्या TVK पक्षाने पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

थलापती विजयने DMK आणि AIDMK या दोन प्रमुख पक्षांना धूळ चारत दक्षिणेच्या राजकारणात शानदार पदार्पण केले आहे. TVK (तामिळगा वेटी कळघम) या पक्षाने बहुमत मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. एम. जी. रामचंद्रन (MGR ), जयललिता, करुणानिधी यांच्यानंतर विजय थलपती यांना तामिळ जनतेने मोठा विजय मिळवून दिला आहे.विजय यांच्या वडिल एस. चंद्रशेखर यांनी काँग्रेस पक्षाशी आघाडी करण्यासाठी हात पुढे केला आहे.

२३४ सदस्यांच्या विधानसभेत विजय थलपती यांच्या पक्षाने ११० जागांपर्यंत मजल मारली आहे आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

No comments to show.

Leave a Comment