अखेर सत्य पुढे आलेच, असे फडणवीस कशाबद्दल म्हणाले ?
कोरोना मृत्यूंची संख्या कमी दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!: देवेंद्र फडणवीस
अखेर सत्य पुढे आलेच…!
मुंबई, दि. १६ जून २०२०
महाराष्ट्र सरकार कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या द़वत असल्याचा आपला संशय खरा ठरला असून अखेर सत्य बाहेर आहे. सरकारनेच मुंबईतील ८६२ आणि इतर जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू आज जाहीर केल्यामुळे राज्यातील एकूण कोरोना मृत्यांच्या संख्येत १३२८ ने वाढ झाली असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस पुढे असे म्हणाले की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्यांवर काय कारवाई करणार, हे सांगा अशी सरकारला विचारणा केली आहे. कोविडच्या रुग्णसंख्येचा घोळ होत असून सरकारकडून जाणीवपूर्वक कोरोनाचे आकडे लववले जात असल्याचा आरोप भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार विचारला होता. आता आकडेवारीचा घोळ उघड झाल्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
