Ads

--

डोनाल्ड ट्रम्प भारताला ‘नरक’ म्हणाले..

By Xtralarge News

April 24, 2026 7:29 pm

Ads

डोनाल्ड ट्रम्प भारताला ‘नरक’ म्हणाले..

मुंबई, दि. २४ एप्रिल..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला नरक म्हणणे हा १४० कोटी भारतीय जनतेचा, भारताच्या हजारो वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा आणि भारतीय विचारांचा अपमान आहे, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 

मोदींनी स्वतः परदेशात जाऊन “पूर्व जन्मात पाप केले म्हणून भारतात जन्म झाला असे लोक म्हणायचे” असे म्हणून याच समकक्ष भारताचा अपमान केला होता. त्यामुळे कदाचित मोदींकडूनच ही प्रेरणा ट्रंपने घेतली असावी. परंतु या ट्रंपना मोदी ठणकावून सांगणार नाहीत म्हणून आपण हे सांगणे आवश्यक आहे की जगाला अमेरिकेचा शोध हा भारतामुळे लागला. कोलंबस अमेरिकेच्या नव्हे तर भारताच्या शोधात तिथे पोहोचला. आणि सगळं जग हे भारत कुठे आहे याचा शोध घेत होते, अमेरिका कुठे आहे याचा नव्हे….

अमेरिकेतील मूळ रहिवाशांना नेटीव्ह इंडियन्स म्हणतात. अमेरिकेचा शोध घेणाऱ्यांना तो भारतच वाटला होता बरं! भारत हा जगाला अध्यात्मिक‌ उन्नती व नैतिकता, मार्गदर्शन करणारा देश आहे.विश्र्वशांती व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करणारा देश! हिंदू, बौद्ध, सीख , जैन इत्यादि अनेक धर्मांचा जन्म भारतात झाला. भारत हा महात्मा गांधींचा देश आहे ज्यांच्या प्रेरणेने अमेरिकेत मार्टिन ल्यूथर व दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला कृष्ण वर्णियांच्या अधिकारासाठी लढले.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत आमचे काही प्रश्न असतील पण ती सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. भारताच्या ग्राहक क्षमतेवर अमेरिकेची अर्थव्यवस्था अवलंबून आहे एवढं लक्षात ठेवा असे सचिन सावंत म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment