Ads

--

NCP मध्ये सर्वकाही ठिक नाही !

By Xtralarge News

April 3, 2026 8:41 pm

Ads

NCP मध्ये सर्वकाही ठिक नाही !

मुंबई दि. ३ एप्रिल –

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दलच्या येणार्‍या बातम्या निराधार आणि तर्क-वितर्क हे निव्वळ काल्पनिक आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करुन विरोधकांची हवा काढून टाकली आहे.

 

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची दशकांहून अधिक काळाची निष्ठा आणि नेतृत्व आपल्या सर्वांना नेहमीच दिशा देत आले आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना मुद्दामहून ओढून-ताणून निर्माण केलेल्या वादात गोवणे हे अत्यंत दुर्दैवी असून, याचा जाहीर निषेध खासदार पार्थ पवार यांनी केला आहे.

No comments to show.

Leave a Comment