Ads

--

चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा.

By Xtralarge News

March 28, 2026 1:26 pm

Ads

चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा.

मुंबई, दि. २८ मार्च २६..

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना दुसऱ्या पदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. अशोक खरात प्रकरणी पक्षाची बदनामी होत असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावी, अशी मागणी पक्षातूनच केली जात होती अखेर चाकणकरांनी राजीनामा दिला आहे. चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.

“खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, गैरकृत्यात माझा दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहेत. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे”, अशी भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली होती.

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे की,“भोंदूबाबा खरात याने शोषण केलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्याऐवजी खरातची दलाली करणाऱ्या ‘डर्टीवुमन’ची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.पीडित महिलांच्या न्यायासाठी पक्ष आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून माझ्यासोबत एकत्रितपणे लढा देणाऱ्या सुषमाताई अंधारे, अंजलीताई दमानिया, संगीताताई तिवारी, आशाताई मिरगे, मनीषाताई कवेडिया यांचे मनःपूर्वक आभार.जेव्हा जेव्हा न्याय होईल…! तेव्हा अजितदादांची आठवण येईल.”

तर NCP शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर टीका केली आहे. ‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला… असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.

No comments to show.

Leave a Comment