मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट !!

0
20201006_103357

मुंबई, दि. 6 ऑक्टोबर:

अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र, ठाकरे सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची एक मोठी मोहीम उघडण्यात आली होती. सोशल मीडियावर हॅशटॅग चालवून दररोज बदनामी करणा-या मेसेजचा  भडीमार करण्यात आली. सुशांत प्रकरणात एका बाजूने राजकीय कोंडी करण्याचा व दुस-या बाजूने सोशल मीडियावरून बदनामी करण्यात आली.
सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलीस करत होते. मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाऊंटस उघडण्यात  आली होती अशी माहिती उघड झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने यासंदर्भातीव एक अहवाल तयार केला आहे. ही बोगस सोशल मीडिया अकाऊंट फक्त भारताबरोबर बाहेरच्या देशातीलही आहेत. इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स या देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत.

यावर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग म्हणाले,”मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली तसेच सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *