Ads

-

अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’,

By Xtralarge News

March 19, 2026 6:05 pm

Ads

अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’,

मुंबई, दि. १९ मार्च २०२६ ;

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे अशी मागणी करून आजपर्यंतचे त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशिर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे, राज्यात अंधश्रद्धेविरोधातील कायदा असतानाही अशोक खरात सारखा भोंदूबाबा त्याचे गोरखधंदे बिनदिक्कतपणे करतो व त्याची कोणालाच भनक लागत नाही हे विशेष. अशोक खरातच्या ट्रस्टवर असलेले व त्याला पाठबळ देणारे जे लोक आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. आसाराम बापू सोबत नरेंद्र मोदी अनेकदा दिसले होते तीच विकृती महाराष्ट्रात फोफावली आहे. नाशिकमध्ये जी विकृती दिसली त्याचे नवल वाटत नाही.

पुरोगामी राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून असे विकृत लोक सत्तेच्या भरोशावर आपले धंदे राजरोसपणे करतात. भाजपाची खुशामतगिरी करणारी ही प्रवृती महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा थांबावी यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आयुष्यभर लढा दिला पण त्यांनाच गोळ्या घालून ठार करण्यात आले असे सपकाळ म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment