School 22

नवी दिल्ली, दि. ५ ऑक्टोबर:

कोरोनाच्या संकटामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुकानं, आस्थापना यांना परवानगी दिल्यानंतर आता शाळेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपासून देशभरातील शाळा उघडण्यास परवानगी दिली असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यासंदर्भातल्या गाइडलाइन्स लागू केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

निशंक पुढे म्हणाले की, १५ ऑक्टोबरपासून टप्प्या टप्प्याने देशातील शाळा सुरु होणार आहेत. आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मार्गदर्शक प्रणाली हे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायचे आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी आहे. पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. विद्यार्थ्यांना रोज हजर रहावेच लागेल असे नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *