‘त्या’ पोलिसांना निलंबित करा !
मुंबई, दि. 4 ऑक्टोबर:
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणा-या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्याशी पोलिसांनी केलेल्या दंडेलशाही व निर्लज्जपणाचा देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनीही नाराजी व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र पाठवून संताप व्यक्त केला आहे.
उत्तरप्रदेश पोलीस प्रशासनाने राहुल गांधी व प्रियंका यांना हाथरसला जाण्यापासून थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातील एका पुरुष पोलीसाने प्रियंका गांधी यांना अक्षरशः कुर्ता पकडून ओढले. याचा त्यांनी खेद व्यक्त केला.
त्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करा अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. बंदोबस्तादरम्यान महिला पोलीस या ठिकाणी असणे आवश्यक होते परंतु असे का झाले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हाथरसचे सर्व प्रकरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारे असल्याने या कुटुंबाला केंद्रीय पोलिसांचे संरक्षण देण्यासाठी देखील विचार व्हावा अशी मागणीही या पत्रात नीलम गो-हे यांनी केली आहे.
