ajit-pawar-plane-crash-conspiracy

अजित पवार यांचा घातपातच..

मुंबई दि. ११ फेब्रुवारी;

अजित पवार याचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत ते विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले,VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं? त्याचा अहवाल समोर का येत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले की, कारने प्रवास करणारे अजित पवार हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा. विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता क?,दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावाच, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवार यांनी बोलताना केली.

रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्त्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. अशी कामं करण्यामध्ये इस्त्रायलचा एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा. अजित पवार यांच्या अपघातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का, याचा तपास व्हावा अशीही रोहित पवार यांनी मागणी केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे. असे रोहित पवार बोलताना म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसात दादांनी प्लॅस्टिक बाटली वापरण्याचं बंद केलं होतं. त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरूवात केली आणि ती बाटली नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षारक्षकाच्या हाती असायची ,त्यांनी असं का केलं, त्यांना काही कुणकुण लागली होती का? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, अजितदादा हे 7 वाजून 50 मिनिटांनी एअरपोर्टवर आले. दादांचे विमान 8 वाजून 10 मिनिटांनी टेक ऑफ केलं. 8.22 वाजता ते विमान हे लोणावळाजवळ असेल. 8.43 ते 8.45 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. 9 वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि 9.45 वाजता दादांचं निधन झाल्याची बातमी आली. हे विमान 16 वर्षांपूर्वीचं विमान होतं. त्याच्या आधी दोन दिवस हे विमान सुरतला जाऊन आलं होतं. विमान चांगल्या स्थितीत होतं आणि वैमानिक अनुभवी होते, पण अपघात धुक्यामुळे झाल्याची शक्यता असल्याचा दावा या विमान कंपनीच्या मालकाने केला. परंतु ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी चित्र वेगळंच दिसतंय. विमान खाली येताना ते कलल्याचं समोर आलं आणि नंतर त्याचा स्फोट झाला हे स्पष्ट झालं,असेही रोहित पवार यांनी स्पष्टपणे सागितले.

यावर सविस्तर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी अजित दादांची क्रू तयारी झाली, 7 वाजून 3 मिनिटांनी बारामती येथी हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी 8.73 ते 8.45 दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल, कारण, 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली होती. तर, 9.45 वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली, तसेच, हे विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आले होते. याचे मालक म्हणाले, हवामानामुळे अपघात झाला असावा,ग्रामपंचायत सीसीटीव्ही समोर आलं आणि त्यातून हवामान परिस्थिती समोर आली आहे. CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं असेल. मॅकेनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रूटीन मेंटेनस झाला नव्हता का? असे प्रश्न उपस्थित होतं आहेत, असेही रोहित पवार यांनी बोलताना म्हटले आहे.

*आमदार रोहित पवार यांचे पाच प्रश्न*

1. विमानात काय बिघाड झाला होता त्यामुळे ते एका बाजूला कललं?

2. त्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का? मेकॅनिकल फेल्युअर झालं असावं काय?

3. टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाचे पाहणी झाली होती का? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?

4. विमानाचा रूटिन मेंटेनन्स झालं नव्हतं का? ते कुणी केलं होतं? विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठे आहे?

5. विमानाचा हेव्ही मेंटेनन्स कधी झाला होता? त्याचा अहवाल कुठे आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *