मुंबई व नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार..
मुंबई व नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार..
मुंबई, दि. ३० जानेवारी २०२६.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान मेट्रो- ८ ची ३५ किमीच्या प्रकल्पास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
या मेट्रो मार्गाची एकूण लांबी ३५ किमी असून भूमिगत मार्ग ९.२५ किमी, उन्नत मार्ग २४.६३६ किमी आहे. या मार्गावर एकूण २० स्थानके, ६ स्थानके भूमिगत तर १४ स्थानके उन्नत असतील. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके असतील. घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-२स्थानकांपर्यंत उन्नत स्थानके असतील. २ स्थानकांमधील सरासरी अंतर १.९ किमी असेल.
या मेट्रोसाठी ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून त्यासाठी ₹ ३८८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण ₹२२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
