Ads

-

… हा आमचा लढा सुरूच राहिल !

By Xtralarge News

October 3, 2020 10:53 pm

Ads

हाथरस,दि. 3 ऑक्टोबर : 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून उत्तर प्रदेश
सरकारनं प्रचंड मोठा बंदोबस्त लावला होता. शुक्रवारी पोलीसांनी राहुल गांधी यांना धक्काबुकी केली, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलीसांनी राहुल व प्रियंका यांना अटक करून दिल्लीकडे पाठवून दिले परंतु शनिवारी पुन्हा हे दोघेजण हाथरसकडे निघाले असता पोलीसांनी रोखले.
पुरुष पोलीसांने प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात लावला, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला पण ते डगमगले नाही. पोलिसांच्या दंडेलीला न जुमानता निर्धारावर ठाम राहिले. शेवटी पाच जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. राहुल व प्रियंका गांधी यांनी हाथरस मध्ये जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.

पीडित कुटुंबाला भेटल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या,’या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच कुटुंबाला धमकी देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी पीडित कुटुंबीयांची इच्छा आहे. कुटुंबाला त्यांच्या मुलीला अखेरचे पाहताही आले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट यांनी हे संपूर्ण प्रकरण अत्यंत बेजबाबदार पद्धतीने हाताळले. खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अडवण्यात पोलीस बळाचा वापर केला. पीडित कुटुंबाला धमकी  देणे, त्यांच्या घराबाहेर  मोठा पोलीस बंदोबस्त लावून कोणालाही त्यांना भेटू दिले नाही. हाथरस गावाला लष्करी छावणीचे रुप आले होते. योगी आदित्य नाथ सरकार या प्रकरणात काहीतरी लपवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून जंगलराज असल्याचे सर्व जगाने पाहिले.

No comments to show.

Leave a Comment