काही राजकारण नाही हा निव्वळ अपघात !
काही राजकारण नाही हा निव्वळ अपघात !
मुंबई, दि. २९ जानेवारी २६ ;
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा अपघात नाही तर घातपात आहे व या अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
संपूर्ण पवार कुटुंब या धक्क्यातून सावरलेले नाही पण अशा कठीण प्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांसमोर येऊन अजित पवार यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली.
शरद पवार म्हणतात, अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
मी मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे असे शरद पवार म्हणाले..
