मुंबई भाजपा कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा…
मुंबई भाजपा कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा…
मुंबई, दिनांक २६ जानेवारी २०२६ :
आज २६ जानेवारी २०२६ रोजी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वसंतस्मृती कार्यालय दादर येथे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान. श्री अमीत साटम यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमीत साटम यांच्यासह भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्रीमती श्वेता परूळकर, कार्यालय प्रमुख श्री. दिनेश जगताप आणि प्रतीक कर्पे तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ध्वजवंदनानंतर अमीत साटम यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, “हा प्रजासत्ताक दिन भारतीय जनता पक्षासाठी खास आहे. कारण, पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये मुंबई शहरातली सर्वात मोठा पक्ष, सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष हा भाजप आहे. १३५ जागा लढवून ८९ नगरसेवक आणि नगरसेविका निवडून आलेल्या आहेत आणि पुढच्याच आठवड्यात महायुतीची महापौर ही मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होऊन हिंदूत्वाचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकणार आहे. हे भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे शक्य झाले आहे आणि मुंबईतील जनता आपल्या सर्वांकडे मोठ्या आशा अपेक्षांनी पाहत आहे. महापालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असून त्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करावं लागणार आहे.”
“आता केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे आणि आगामी काळात महापालिकेवरही आपलं सरकार येणार असून त्यानंतर मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर विकासात्मक बदल दिसायला हवा. परिवर्तन खऱ्या अर्थाने जनतेला जाणवलं पाहिजे. जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करणं हे फक्त निवडून आलेल्या नगरसेवकांचं काम नाही तर जमिनीवर काम करणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं हे दायित्व असेल. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आगामी काळत काम करावं लागेल. जेव्हा पुढील निवडणुका येतील तेव्हा मुंबईकर जनतेच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला उभं राहता आलं पाहिजे एवढं सुंदर काम करायचं आहे.” असेही ते म्हणाले.
