किती दिवस मुंबईचा पैसा, जमीन व उद्योग गुजराती मित्राला देणार.
किती दिवस मुंबईचा पैसा, जमीन व उद्योग गुजराती मित्राला देणार.
मुंबई, दि. १२ जानेवारी..
भारतीय जनता पक्ष महायुती मुंबईतील जमीन, उद्योग व पैसा मोठ्या प्रमाणात एका गुजराती मित्राला देत आहेत, हा मुंबई व मुंबईकरांशी मोठा धोका आहे. मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का, याचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. मुंबईतील जमिनी विकून भाजपा शिदेंसेनेने अमाप पैसा जमवला आहे. मुंबईत आता परिवर्तनची गरज असून मुंबईशी धोका करणाऱ्या भ्रष्ट महायुतीला मुंबईकर निवडणुकीत धडा शिकवतील, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यम व प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी म्हटले आहे.
मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या विशेष पत्रकार परिषदेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव U.B. व्यंकटेश, राष्ट्रीय सचिव सचिन सांवत, उदित राज आदी उपस्थित होते.
यावेळी पवन खेरा म्हणाले की, भाजपा महायुतीने मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार करून मुंबईकरांचा पैसा लुटला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईकरांना पायाभुत सुविधा मिळत नाहीत. रस्त्यावर खड्डे आहेत, पिण्याचे पाणी मिळत नाही पण पावसाळ्यात घरात पाणी शिरते. दिल्लीपेक्षा जास्त प्रदुषण मुंबईत आहे.
शाळा, बेस्ट बस, बीएमसीची रुग्णालये यांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. विकासासाठी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे पण तो विरोधी पक्षाला दिला जात नाही, हा पैसा मोदी व अमित शाह यांचा नाही तर जनतेचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्ष का टाळल्या याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे.
निवडणुका आल्या की भाजपाला बांग्लादेशींचा मुद्दा आठवतो व व नंतर ते विसरून जातात. आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत तेथेही तोच मुद्दा सुरु आहे. देशात अवैध बांग्लादेशी आले आहेत, तर मोदी शाह काय करत आहेत, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असेही पवन खेरा म्हणाले.
यावेळी उदित राज म्हणाले की, मुंबईत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुका लढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माननाऱ्या लोकांनी काँग्रेस व वंचित आघाडीला मतदान करावे. भाजपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचे काम करत आहे तर ते वाचवण्याची लढाई काँग्रेस नेते राहुल गांधी लढत आहेत. भाजपा हिंदु मुस्लीम असा वाद उभा करून मते मागत आहेत, त्यांच्या या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.
