Ads

---

एच. के. पाटील यांच्या प्रकृतीची सोनिया गांधींकडून विचारपूस!

By Xtralarge News

October 3, 2020 11:04 am

Ads

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२०:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या उपचार घेत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोन करुन पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाटील यांना ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छाही यावेळी सोनिया गांधी यांनी दिल्या.
एच. के. पाटील हे मागील आठवड्यात मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आपण दहा दिवसासाठी क्वारंटाईन होत असल्याची माहिती पाटील यांनी ट्विट करुन दिली होती. त्यांनी लवकर बरे व्हावे, यासाठी काँग्रेस नेते व पदाधिकारी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment