Friday, January 23, 2026
Homeताज्या बातम्या'मेस्सी' नावाचा 'वानखेडे'वर जल्लोष.

‘मेस्सी’ नावाचा ‘वानखेडे’वर जल्लोष.

‘मेस्सी’ नावाचा ‘वानखेडे’वर जल्लोष.

मुंबई, दि. १५ डिसेंबर:

जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फुटबॉल प्रेक्षकांकडे भिरकवताच प्रेक्षकांनी लिओनोल मेस्सी या नावाचा जल्लोष केला. संपूर्ण मैदान मेस्सीच्या नावाने दुमदुमत होते.

या वेळेला जागतिक फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला सचिन तेंडुलकर यांच्या नावाची दहा नंबरची जर्सी सचिन तेंडुलकर यांनी भेट केली. जागतिक फुटबॉलपटू लिओनाल मेस्सीनेही सचिन तेंडुलकर याला फुटबॉल भेट दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी यांनी जर्सी भेट दिली.

पार्थ जिंदाल, वेदना जिंदाल यांनी जिंदाल ग्रुपतर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत ७५ लाख रुपयांचा चेक प्रोजेक्ट महादेवाला दिला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत ९९ लाख ९९ हजार रुपयांचा धनादेश प्रोजेक्ट महादेवाला दिला.

सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार..

‘प्रोजेक्ट महादेवा’ हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशा, तळागाळातील सहभाग, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे.

प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम.

प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल प्रतिभेचा (१३ वर्षांखालील) शोध घेण्यासाठी आणि त्यांना विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या ६० खेळाडूंची (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

लोकप्रिय

टिप्पण्या