शेतकरी मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला वेळेतच पाठवला.

0
_1745480373

शेतकरी मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला वेळेतच पाठवला

मुंबई दि. ४ डिसेंबर २५ :

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या मदतीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवला नाही असे भाजपा सरकारचेच केंद्रीय कृषी मंत्री मंत्री शिवराज चौहान यांनी लोकसभेत सांगितले. पण महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे वेळेत प्रस्ताव पाठविला, त्यानंतरच केंद्राचे पाहणी पथक येऊन पाहणी करून गेले, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

बावनकुळे म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्या पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी यासाठी सरकार कटीबद्ध आहे. म्हणूनच, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाठपुरावा करणारी दोन पत्रे केंद्राकडे पाठविली. दोन्ही प्रस्तावांच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल. यात खरे कोण बोलत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *